CCTNS या विषयावर कविता पाटील यांचे मार्गदर्शन.

पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड येथे CCTNS ( क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम) या विषयावर कोल्हापूर जिल्हा पोलीस येथील कविता पाटील यांनी सत्र क्रमांक 45 व 46 मधील प्र.पो.शी. यांना मार्गदर्शन केले.
या वेळी प्राचार्य मा.श्री नंदकुमार ठाकूर , उप प्राचार्य श्री रघुनाथ शिंदे , उप प्राचार्य म.पो.से डॉ. सई भोरे-पाटील सर्व आंतर वर्ग व बाह्य वर्ग पोलीस अधिकारी, प्रशिक्षक उपस्थितीत होते.
*CCTNS विषयी मुख्य माहिती*
1. उद्देश:
गुन्हे आणि गुन्हेगारांशी संबंधित डेटा संग्रहीत करणे आणि शेअर करणे.
पोलिस स्टेशन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना ऑनलाइन डेटाबेससह जोडणे.
तपास प्रक्रियेत गती आणि कार्यक्षमतेत वाढ करणे.
2. प्रमुख वैशिष्ट्ये:
देशभरातील पोलीस स्टेशन एकमेकांशी डिजिटल नेटवर्कद्वारे जोडले जातात.
गुन्हेगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार केला जातो.
FIR, चौकशी अहवाल, खटले, न्यायालयीन आदेश, सजा आणि अपील प्रक्रिया ट्रॅक करता येते.
नागरिकांना ऑनलाईन तक्रार नोंदणी, पोलीस व्हेरिफिकेशन आणि इतर सेवा पुरवतात.
3. लाभ:
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत होते.
तपासासाठी डेटा सहज उपलब्ध होतो, ज्यामुळे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढते.
विविध राज्यांमधील पोलीस यंत्रणांमध्ये समन्वय सुधारतो.
नागरीकांना पोलीस सेवा अधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने मिळतात.