दिनांक २१/०५/२०२५ रोजी दौंड नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्रात दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिवसानिमित्त शपथविधी संपन्न.
दिनांक २१/०५/२०२५ रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड येथे दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिवसाचे औचित्य साधून पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड येथे विशेष शपथविधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात मा.श्री नंदकुमार ठाकूर ,भा.पो.से. , रघुनाथ शिंदे उप प्राचार्य सर्व आंतर वर्ग व बाह्य वर्ग पोलीस अधिकारी, प्रशिक्षक ,चतुर्थी श्रेणी कर्मचारी मंत्रालयीन , वैद्यकीय अधिकारी यांनी या कार्यक्रमात दहशतवाद, जातीय तेढ, धार्मिक कट्टरता व हिंसाचाराचा तीव्र निषेध करत राष्ट्रीय एकात्मता, शांतता आणि सामाजिक सलोखा यासाठी दहशतवाद व हिंसचार विरोधी दिवस असल्याने शपथ घेण्यात आली.,