Photos
- Commando Training
- दिनांक 21 /06/ 2023 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज- दौंड येथील मुख्य कवायत मैदान येथे साजरा करण्यात आला.
- पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या निर्देशानुसार वश्रीमती कल्पना बारवकर मॅडम प्राचार्य तथा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाने पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस अधिकारी अंमलदार व कर्मचारी यांच्या करता आरोग्य शिबीर दिनांक 02/07/2023 रोजी आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये प्राचार्य मॅडम यांच्यासह पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस अधिकारी अंमलदार व कर्मचारी यांची फक्त तपासणी तसेच इतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याबाबतची काही क्षणचित्रे
- पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज-दौंड येथे माननीय प्राचार्य श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाने दिनांक 04/08/2023 रोजी संस्कार प्रायमरी अँड हायस्कूल दौंड व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवडी येथील विद्यार्थी यांना पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज विषयी माहिती तसेच शारीरिक व शस्त्र कवायत दाखवतानाची पोलीस अधिकारी व प्रशिक्षण यांची क्षणचित्रे.
- पोलीस प्रशिक्षण केंद्र नानविज येथे माननीय अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांच्या संकल्पनेतून व श्रीमती कल्पना बारवकर, प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाने दिनांक 07/08/2023रोजी मोबाईल फोटोग्राफी या विषयाबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये मोबाईल फोटोग्राफी या विषयाचे ज्ञान असलेले श्री पंकज हरोलीकर व ऋषिकेश जोशी vyom स्टुडिओ, पुणे यांनी मोबाईल फोटोग्राफी विषयी सखोल मार्गदर्शन केले. सदर शिबिरा करता उपस्थित असलेल्या प्राचार्य मॅडम,पोलीस अधिकारी व प्रशिक्षणार्थी यांची क्षणचित्रे.
- झुंबा डान्स प्रोग्राम
- मा. श्रीमती कल्पना बारवकर प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड यांचे मार्गदर्शनातून सर्व आंतरवर्ग, बाह्यवर्ग अधिकारी, अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच सत्र क्रमांक 43 चे पोलीस प्रशिक्षणार्थी यांचे मनाच्या सर्वांगीण विकासासाठी दिनांक 14082023 रोजी प्रेरणा मंदिर येथे सकाळी 11.00 वाजता मनाची अमर्याद शक्ती व तणाव मुक्ती या विषयावर तज्ञ व्याख्याते श्री. दत्ता कोहिनकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
- पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज - दौंड येथील सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार ,वर्ग चार कर्मचारी व मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी दिनांक 09 /08 /2023 रोजी सकाळी 10:00 वाजता शासनाच्या निर्देशाप्रमाणे "पंचप्राण" मेरी माटी मेरा देश" शपथ घेतली.
- पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड येथे दिनांक 11/08/2023 रोजी माननीय प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाने ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे व मारुती ब्लड बँक दौंड यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले. त्यामध्ये प्रशिक्षण केंद्रातील पोलीस अधिकारी, प्रशिक्षक, कर्मचारी व सत्र क्रमांक 43 मधील प्रशिक्षणार्थी मिळून एकूण 445 रक्त हे ब्लड बँकेस सुपूर्द केले गेले त्याबाबतची काही क्षणचित्रे.
- पोलीस प्रशिक्षण केंद्रास सन 2022-23 मधील या कालावधीमध्ये केलेल्या सर्वोत्तम कामगिरी करता ISO 9001:2015 चे मानांकन प्राप्त करण्यासाठी प्रशिक्षण केंद्राच्या मूल्यांकन करता कमिटी आलेली होती. कमिटीतील सदस्य यांना प्रशिक्षण केंद्रातील उत्कृष्ट कामे , कार्यालयीन कामकाज , नाविन्यपूर्ण प्रकल्प इत्यादींची माहिती तसेच सर्व बाबींचे सादरीकरण करताना मा. श्रीमती कल्पना बारवकर, प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड व ISO 9001:2015 चे कमिटी सदस्य यांची क्षणचित्रे .
- सर्व आंतरवर्ग, बाह्यवर्ग अधिकारी, अंमलदार, कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांचेकरीता दिनांक 17/08/2023 रोजी प्रेरणा मंदिर येथे "आपले आरोग्य आपल्या हाती" या विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित आयुर्वेदिक व मनसोपचार या विषयावरील तज्ञ व्याख्याते डॉ.श्री. अतुल राक्षे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले . त्याबाबतची काही क्षणचित्रे
- दिनांक 18/08/2023 रोजी मा.प्राचार्य श्रीमती कल्पना बारवकर यांनी शासनाचे आदेशान्वये स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला तसेच सद्भावना दिनानिमित्त सर्व बह्यवर्ग पोलीस अधिकारी,अंमलदार , मंत्रालयीन कर्मचारी यांना शपथ देण्यात आली.
- पोलीस प्रशिक्षण केंद्र नानविज येथे दिनांक 25/08/2023 रोजी आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी दौंड नगरपरिषद येथील अग्निशामक दलाचे श्री जगताप, फायरमॅन यांनी पोलीस अधिकारी अंमलदार व सत्र क्र . 43 मधील प्रशिक्षणार्थी यांना अग्निशमन व त्याबाबत करावयाची कारवाई याविषयी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले
- पोलीस प्रशिक्षण केंद्र नानविज येथे दिनांक 28/08/2023 ते 29/08/2023 रोजी अंतर पोलीस क्रीडा स्पर्धा मा. श्रीमती कल्पना बारवकर प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज- दौंड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. या स्पर्धेमध्ये पोलीस अधिकारी अंमलदार व सत्र क्रमांक 43 मधील पोलीस प्रशिक्षणार्थी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन पारितोषिके पटकावली. सन 2023 मधील या अंतर पोलीस क्रीडा स्पर्धा मध्ये सांघिक खेळामध्ये कबड्डी, हॉलीबॉल ,फुटबॉल , बास्केटबॉल व क्रिकेट या खेळाचे आयोजन करण्यात आले तसेच ॲथलेटिक्स मध्ये 100 मीटर, 200 मि.400 मी. 800 मी.1500 मी. व 10 किलोमीटर धावणे यासह गोळा फेक, भाला फेक, 4x 100 रीले या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या अंतर पोलीस क्रीडा स्पर्धाच्या सांगता समारंभ यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य श्रीमती कल्पना बारवकर या लाभल्या त्यांनी पोलीस क्रीडा स्पर्धेचा इतिहास सांगून सर्व खेळाडू प्रशिक्षक अधिकारी यांना मुलाचे मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या हस्ते सर्व पदक विजेत्यांना पदके देण्यात आली यावेळी मार्चपास चे संचलन पाच संघांकडून करण्यात आले त्यामध्ये प्रताप, तोरणा ,जंजिरा , शिवनेरी व पुरंदर हे संघ सहभागी झाले. बेस्ट ऍथलेटिक म्हणून प्रपोशी आकाश रामचंद्र हलके तर ॲथलेटिक्स व जनरल चॅम्पियनशिप ही तोरणा या संघाला देण्यात आली. या शानदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राखीव पोलीस निरीक्षक श्री सांगळे यांनी तर आभार प्रदर्शन व उप प्राचार्य श्री शिंदे यांनी केले. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा आस्वाद सर्व खेळाडू प्रशिक्षक अधिकारी अंमलदार मंत्रालयीन कर्मचारी यांनी घेतला. या संस्मरणीय क्रीडा स्पर्धेची काही क्षणचित्रे.
- सर्व आंतरवर्ग, बाह्यवर्ग अधिकारी, अंमलदार, कर्मचारी व सत्र क्रमांक 43 मधील प्रशिक्षणार्थी यांचेकरीता दिनांक 12/09/2023 रोजी प्रेरणा मंदिर येथे "भावनिक प्रज्ञावंत पोलीस" या विषयावरील तज्ञ व्याख्याते श्रीमती मयुरी पवार, पोलीस उपनिरीक्षक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले . त्याबाबतची काही क्षणचित्रे
- सर्व आंतरवर्ग, बाह्यवर्ग अधिकारी, अंमलदार, कर्मचारी व सत्र क्रमांक 43 मधील प्रशिक्षणार्थी यांचेकरीता दिनांक 13/09/2023 रोजी प्रेरणा मंदिर येथे "मनाचे आरोग्य " या विषयावरील तज्ञ व्याख्याते श्री. मनोहर जोशी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपायुक्त यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले . त्याबाबतची काही क्षणचित्रे
- सर्व आंतरवर्ग, बाह्यवर्ग अधिकारी, अंमलदार, कर्मचारी व सत्र क्रमांक 43 मधील प्रशिक्षणार्थी यांचेकरीता दिनांक 14/08/2023 रोजी प्रेरणा मंदिर येथे "भविष्यातील गुंतवणूक " या विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूक सल्लागार मा.श्री. गौरव सिंघवी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले . त्याबाबतची काही क्षणचित्रे