पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजरा.
पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये तसेच मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या निर्देशानुसार दहा हजार वृक्ष लागवड कण्याचे व त्याचे संगोपन करणेबाबत कळविण्यात आले होते. त्या अनुषंगाने पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये मा. प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी , कर्मचारी प्रशिक्षणार्थी यांच्या करवी वृक्षारोपण करण्यात आले.