पोलीस प्रशिक्षण केंद्र , नानवीज दौंड येथील नवप्रविष्ठ चालक पोलिस शिपाई सत्र क्रमांक ४५ यांचा दीक्षांत संचालन समारंभ दिनांक २२/०३/२०२५
पोलीस प्रशिक्षण केंद्र , नानवीज दौंड येथील नवप्रविष्ठ चालक पोलिस शिपाई सत्र क्रमांक ४५ यांचा दीक्षांत संचालन समारंभ दिनांक २२/०३/२०२५ रोजी प्रमुख अतिथी मा. श्री. प्रवीणकुमार पडवळ भा.पो. से . विशेष पोलीस महानिरीक्षक , प्रशिक्षण व खास पथके , महाराष्ट्र राज्य मुंबई . यांच्या प्रमुख उपस्थितीत व माननीय श्री नंदकुमार ठाकूर , भा.पो.से.प्राचार्य तथा पोलीस अधीक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड तसेच सर्व पोलीस अधिकारी ,अंमलदार व कर्मचारी वृंद पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड यांच्या मार्गदर्शनातून संपन्न झाला.
"नवप्रविष्ठ पोलिसांनी सेवाकाळात महाराष्ट्र पोलिस दलाच्या 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ' या ब्रीदवाक्याला साजेसे वर्तन ठेवावे. तसेच महाराष्ट्र पोलिस दलात कर्तव्यनिष्ठेने समाजाचे रक्षण करावे," असे आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक (प्रशिक्षण व खास पथके) प्रवीणकुमार पडवळ यांनी केले आहे.