Skip to content
+91-2117299291
+91 8380084549
prin.ptsnanveej@mahapolice.gov.in
We strive for the best

Police Training Center Nanveej-Daund

Tal- Daund, Dist- Pune

Police Training Center Nanveej- Daund

Menu

“पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज, दौंड येथे आंतरक्रीडा स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले.”

आंतरक्रीडा स्पर्धा २०२६

नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्र, दौंड येथे दिनांक १२/१०/२०२६ रोजी आंतरक्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन मा.श्री.रमेश चोपडे , प्राचार्य तथा पोलीस अधीक्षक, यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री.रघुनाथ शिंदे, श्री नामदेव बंडगर,उपप्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड सर्व अंतर वर्ग, बाह्य वर्ग पोलीस अधिकारी, अंमलदार, वैद्यकीय अधिकारी, मंत्रालयिन कर्मचारी , चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच सत्र क्रमांक ४९ व ५० मधील नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी उपस्थित होते

या क्रीडा स्पर्धेत प्रशिक्षणार्थी व अधिकारी-कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धेत खालील प्रमुख खेळांचा समावेश होता :

धावण्याच्या शर्यती

फुटबॉल व व्हॉलीबॉल

गोळाफेक, भालाफेक
खेळाडूंनी उत्कृष्ट क्रीडाभाव, शिस्त व जिद्दीने खेळाचा आनंद घेतला. विजयी खेळाडूंना पदके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेमुळे शारीरिक तंदुरुस्ती, संघभावना, शिस्त व क्रीडाभावना अधिक दृढ झाली.