महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त जिजामाता भाऊसाहेब भागवत माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींना वुमन सेफ्टी,तसेच POCSO “लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कसे करायचे या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त सप्ताहाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मा. श्री. नंदकुमार ठाकूर,प्राचार्य तथा पोलीस अधीक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 02/01/2026 रोजी श्रीमती जिजामाता भाऊसाहेब भागवत माध्यमिक विद्यालय गोपाळवाडी तालुका दौंड जिल्हा पुणे येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींना वुमन सेफ्टी, तसेच POCSO “लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कशे करायचे या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
POCSO म्हणजे Protection of Children from Sexual Offences Act, 2012
मराठीत याला “लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम, २०१२” असे म्हणतात.
थोडक्यात माहिती:
हा कायदा १८ वर्षांखालील मुला-मुलींच्या लैंगिक शोषणाविरोधात आहे.
बालकांवर होणाऱ्या
लैंगिक अत्याचार
लैंगिक छळ
अश्लील वर्तन
पोर्नोग्राफी
यांसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी हा कायदा लागू आहे.
POCSO कायद्याची वैशिष्ट्ये:
बालकांसाठी वेगळी न्यायप्रक्रिया (Special Court)
गुन्हा नोंदवणे बंधनकारक आहे
पीडित बालकाची ओळख गोपनीय ठेवली जाते
कठोर शिक्षा व दंडाची तरतूद आहे
शिक्षा:
गुन्ह्याच्या स्वरूपानुसार
किमान ३ वर्षांपासून ते जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते.







