पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे राष्ट्रीय एकता दिवस (National Unity Day) ३१ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला.
दिनांक ३१/१०/२०२५ रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड येथे राष्ट्रीय एकता दिवस (National unity day) कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात मा.श्री नंदकुमार ठाकूर ,भा.पो.से. , रघुनाथ शिंदे उप प्राचार्य सर्व आंतर वर्ग व बाह्य वर्ग पोलीस अधिकारी, प्रशिक्षक , वैद्यकीय अधिकारी तसेच सत्र क्रमांक ४७ अंमलदार उपस्थित होते.
🗓️ राष्ट्रीय एकता दिवस (National Unity Day)
दिनांक: ३१ ऑक्टोबर
प्रसंग: सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन
स्थापना: २०१४ साली भारत सरकारने हा दिवस “राष्ट्रीय एकता दिवस” म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.
उद्देश: देशातील नागरिकांमध्ये एकता, अखंडता आणि सुरक्षिततेचा संदेश पसरवणे.
थीम: “एक भारत, श्रेष्ठ भारत” (Ek Bharat, Shreshtha Bharat)
🏃♂️ रन फॉर युनिटी (Run for Unity)
अर्थ: “एकतेसाठी धाव”
उद्देश: लोकांना एकत्र आणणे, विविधतेतून एकतेचा संदेश देणे.















