३६ वी अंतर क्रीडा स्पर्धा २०२५
३६ वी आंतरक्रीडा स्पर्धा २०२५
नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्र, दौंड येथे दिनांक २५/०९/२०२५ रोजी ३६ वी आंतरक्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय दंडाधिकारी दौंड माननीय श्री रेवणनाथ बाबुराव लबडे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या वेळी प्राचार्य मा.श्री नंदकुमार ठाकूर ,भा.पो.से. , श्री रघुनाथ शिंदे उप प्राचार्य सर्व आंतर वर्ग व बाह्य वर्ग पोलीस अधिकारी, प्रशिक्षक व सत्र क्रमांक ४७ चे प्रशिक्षणार्थी उपस्थितीत होते.
या क्रीडा स्पर्धेत प्रशिक्षणार्थी व अधिकारी-कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धेत खालील प्रमुख खेळांचा समावेश होता :
धावण्याच्या शर्यती
फुटबॉल व व्हॉलीबॉल
गोळाफेक, भालाफेक
खेळाडूंनी उत्कृष्ट क्रीडाभाव, शिस्त व जिद्दीने खेळाचा आनंद घेतला. विजयी खेळाडूंना पदके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेमुळे शारीरिक तंदुरुस्ती, संघभावना, शिस्त व क्रीडाभावना अधिक दृढ झाली.