मा.पो.उप महानिरीक्षक श्री अतुल पाटील (DIG) यांनी वाहनचालक प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले.

पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड येथे , मा.पो.उप महानिरीक्षक श्री अतुल पाटील (DIG) यांनी वाहनचालक प्रशिक्षणार्थी मार्गदर्शन केले. यावेळी मा.श्री नंदकुमार ठाकूर , भा.पो.से,श्री रघुनाथ शिंदे उप प्राचार्य सर्व आंतर वर्ग व बाह्य वर्ग पोलीस अधिकारी, प्रशिक्षक, सत्र क्रमांक 45 व 46 मधील चालक पोलीस प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
मार्गदर्शनातील प्रमुख मुद्दे खालील प्रमाणे
1. वाहन चालवण्याचे तंत्र (Driving Techniques)
सुरक्षित व प्रभावी वाहनचालन तंत्र
वाहतुकीचे नियम व कायदे
आपत्कालीन परिस्थितीत वाहन हाताळण्याची कौशल्ये
2. वाहन देखभाल व मेंटेनन्स (Vehicle Maintenance)
वाहनांचे नियमित सर्व्हिसिंग
इंजिन, ब्रेक, गिअर आणि टायरची तपासणी
इंधन बचतीच्या तंत्रांचा अवलंब
3. आपत्कालीन परिस्थितीत वाहन वापर (Emergency Vehicle Handling)
गुन्हेगारी घटनांमध्ये वेगवान आणि सुरक्षित प्रतिसाद
व्हीआयपी सुरक्षा आणि ताफा व्यवस्थापन
अपघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय
4. संवाद आणि शिस्त (Communication & Discipline)
वायरलेस सेट आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
शिस्तबद्ध आणि जबाबदारीने वाहन चालवण्याचे नियम
सहकाऱ्यांसोबत समन्वय साधून कार्य करणे